महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी कला ते राजकारण आणि राजकारण ते रंगमंच प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटातून रेखाटण्यात आला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जवळपास अडीच मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये पुलंच्या जीवनाचा उत्तरार्ध पाहायला मिळत आहे. उत्तरार्धात सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीनं पहिल्या भागात पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात पुलंची आणखी एक बाजू पाहायला मिळणार आहे. पुलंचं साहित्य, नाटकातलं योगदान ते उतारवयातील पु.ल. अशा प्रवासाची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

पु लं देशपांडे या व्यक्तिमत्त्वाचं वयाच्या तिशी पलिकडील आयुष्य चित्रपटात अभिनेता विजय केंकरे यांनी साकारले आहे. पुलंचा चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये शंभर टक्के प्रवेश कसा झाला, आणिबाणीच्या काळातील पुलंनी घेतलेल्या भूमिका, बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’साठी केलेली मदत अशा अनेक घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.