टीव्ही शो ‘भाभी जी घरपर है’ गेल्या सात वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. इतक्या वर्षांनी त्याची लोकप्रियता आजही कायम आहे. या शोमधील पात्र तिवारी जी, विभूती नारायण सिंह, अंगूरी भाभी आणि इन्स्पेक्टर हप्पू सिंग हे घरोघरी ओळखीचे झाले आहेत. ही पात्र साकारणाऱ्या कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. दरम्यान, अलीकडेच या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे ही ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली. त्यानंतर तिने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…पण ते कधीच पुरेसं नसेल!”; अभिनेत्री भाग्यश्री मोटेची बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

नुकतंच एका मुलाखतीत शुभांगी अत्रेने ती ऑनलाइन फसवणुकीची बळी कशी ठरली, याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “८ सप्टेंबर रोजी मी एका प्रसिद्ध फॅशन अॅप्लिकेशनमधून माझ्यासाठी काही गोष्टी ऑर्डर करत होते. मी ऑर्डर दिली त्यानंतर मला त्यांचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्याने माझा पत्ता सांगितला आणि मी तीन वर्षांपासून तिथून खरेदी कशी करत आहे, याबद्दल सांगितलं. नंतर त्याने माझ्या मागच्या सर्व ऑर्डरच्या डिटेल्स दिल्या. त्यामुळे हा खरा कॉल असल्यासारखं मला वाटलं. कारण माझ्या सर्व ऑर्डर डिटेल्स फक्त त्याच कंपनीकडे असतील असं मला वाटलं.”

Video : इंडस्ट्रीतील सर्वात सेक्सी पुरूष कोण? या प्रश्नावर ऐश्वर्याने लाजत घेतलं होतं सलमान नाव

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “आधी दोन मुली माझ्याशी बोलल्या आणि नंतर दोन मुलंही यात सहभागी झाली. मुलींनी मला सांगितलं की मी त्यांची प्रीमियम मेंबर आहे, त्यामुळे ते मला एक प्रॉडक्ट मोफत देऊ इच्छितात. मला असे अनेक फोन येतात पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. यावेळी मात्र मला तो कॉल खरा वाटला म्हणून मी होकार दिला. मला अनेक पर्याय देऊन त्यातील एक गोष्ट निवडण्यास सांगितलं. तसेच मला जीएसटीची रक्कम भरावी लागेल, असंही ते म्हणाले. मग मी जीएसटीचे पैसे देताच माझ्या खात्यातून अनेक ट्रान्झॅक्शन झाले आणि पैसे कापले गेले. माझी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मी सर्व कार्ड ब्लॉक केले.”

तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्राला न सांगताच उरकला साखरपुडा? अभिनेता तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला….

“माझ्याबरोबर असं होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं, कारण मला अधिकृत वेबसाइटवरून सर्व मेसेज येत होते. पण माझ्या खात्यातून पैसे कापले गेल्यावर माझी फसवणूक झाल्याचं मला लक्षात आलं. त्यामुळे मी माझ्या सर्व चाहत्यांना सांगते की, जागरूक राहा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि कॉल उचलू नका. आशा आहे की माझी फसवणूक करणारे लोक पकडले जातील. झालेला प्रकार खूपच त्रासदायक होता. माझ्या खात्यातून गेलेले पैसे हे माझ्या मेहनतीचे होते आणि माझे पैसे कोणीही बेकायदेशीर, चुकीच्या कामांसाठी वापरू नये असं मला वाटतं,” असं अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhabi ji ghar par hai fame actress shubhangi atre conned by online fraud shares experience hrc