दिवाळीच्या पाच दिवसातला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि औक्षण केल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. प्रत्येक बहीण- भावासाठी हा सण खास असतो. अशावेळी नेहमीच आपल्या कामकाजात व्यग्र असणारे सेलिब्रिटीसुद्धा बहीण- भावासाठी आवर्जून वेळ काढतात. असे अनेक मराठी सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या खऱ्या आयुष्यातील बहीण- भावंडांविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. आज भाऊबीजेनिमित्त अशाच काही मराठी सेलिब्रिटींच्या भाऊबहिणींविषयी जाणून घेऊयात..

अभिनय बेर्डे


दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे. भाऊबीज हा बेर्डे कुटुंबातील सर्वांत मोठा सण असल्याचं अभिनय सांगतो. विशेष म्हणजे स्वानंदी ही एकच बहीण आहे आणि बेर्डे कुटुंबात जवळपास दहा ते बारा भाऊ आहेत. अभिनय आणि स्वानंदी यांची बॉडींग खूपच चांगली आहे.

अमेय वाघ


अमेय वाघला एक लहान बहीण आहे. बहिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत अमेयने ती त्याच्याहून अधिक समजूतदार असल्याचं सांगितलं होतं.

गश्मीर महाजनी


गश्मीर महाजनीला वयाने १३ वर्षांनी मोठी बहीण आहे. रश्मी असं तिचं नाव असून लग्नानंतर ती बेळगावमध्ये राहते.

संस्कृती बालगुडे


अभिनेत्री संस्कृती बालगुडेला लहान भाऊ आहे. तिच्यापेक्षा तो तीन वर्षांनी लहान आहे. समर्थ असं त्याचं नाव असून लहान असला तरी तो नेहमी एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी उभा असल्याचं संस्कृती म्हणते.

सिद्धार्थ जाधव


अभिनेता सिद्धार्थ जाधवला एक बहीण आणि एक भाऊ आहे. तिघा भावंडांमध्ये सिद्धार्थ लहान आहे.

शशांक केतकर


अभिनेता शशांक केतकरला लहान बहीण असून तिचं नाव दीक्षा असं आहे.

सोनाली कुलकर्णी


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला दोन भाऊ आहेत. संदीप आणि संदेश कुलकर्णी अशी त्यांची नावं आहेत.

पूजा सावंत


पूजा सावंतच्या लहान भावाचं नाव श्रेय आहे. त्याच्या वाढदिवशी पूजाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता.

 

Story img Loader