अभिनेता आणि ॲड गुरू भरत दाभोळकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. भरत यांनी सोशल मीडियावर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “अब आएगा मजा…”, मेट्रो कारशेडवरून सुमीत राघवनची पोस्ट चर्चेत

भरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत. हा फोटो १९९३ साली काढलेला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. “गब्बर मुक्त भारत अभियान सुरू करण्यापूर्वीचा, जय-वीरुचा तरुणपणातील फोटो मिळाला”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

दाभोळकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात फिलिप्स येथे प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती. त्या नंतर त्यांनी अमूल बटरच्या जाहिरातींसाठी दीर्घकाळ काम केले. भरत दाभोळकर यांनीन १५ हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. परंतु मुळात ते एक ‘जाहिरात तज्ञ’ किंवा ‘अ‍ॅडगुरू’ म्हणून जास्त ओळखले जातात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat dabholkar shared narendra modi and amit shah s old photo dcp