Keshavrao Bhosale Theater Kolhapur Massive Fire : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गुरुवारी (८ ऑगस्टला) अग्नीतांडवामुळं जळून खाक झालं. यामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींसह, मराठी नाट्यसृष्टीला धक्काच बसला. केशवराव भोसले नाट्यगृहाला जळून खाक होताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. मराठी कलाकार या घटनेविषयी हळहळ व्यक्त करत आहेत. “अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी घटना”, असं अभिनेते भरत जाधव ( Bharat Jadhav ) म्हणाले.

भरत जाधव ( Bharat Jadhav ) यांनी सोशल मीडियावर केशवराव भोसले नाट्यगृहाचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. भरत यांनी लिहिलं आहे, “अतिशय दुःखद घटना…संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात आवडत्या नाट्यगृहांपैकी एक. नुकत्याच माझ्या ‘अस्तित्व’ या नाटकाला ‘महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेची’ भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची रंगीत तालीम मी याच नाट्यगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणं ही घटना अत्यंत क्लेशदायक व मनाला चटका लावून जाणारी आहे. आजपर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील.”

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
Hadapsar fire
Video: पुण्यातील हडपसर भागातील जुन्या इमारतीत आग, लहान मुलांसह सात रहिवाशांची सुटका
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Battle of prestige for both NCP sharad pawar and ajit pawar in Pimpri Assembly Constituency
बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

हेही वाचा – Video: प्राजक्ता माळीसाठी पृथ्वीक प्रतापने शेअर केली खास पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “जोडी एकदम खतरनाक…”

भरत जाधव ( Bharat Jadhav ) यांच्या पोस्टला बऱ्याच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहेत. अभिनेत्री रुजुता देशमुख म्हणाली, “चटका लावून जाणारी गोष्ट घडली आहे…अगदी खरं”. तसंच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लवकरच हे नाट्यगृह नव्याने उभं राहू दे आणि आम्हाला आपलं नाटक पाहण्याचा योग पुन्हा येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”

हेही वाचा – Video: ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहून मराठी अभिनेत्रीला अश्रू अनावर, म्हणाली, “आमचं वैभव…”

Keshavrao Bhosale Theater (Photo Credit - Loksatta Graphic Team)
Keshavrao Bhosale Theater (Photo Credit – Loksatta Graphic Team)

वारसा जळून खाक झाला – प्रियदर्शन जाधव

दरम्यान, प्रियदर्शन जाधव, प्राजक्त देशमुख, सोनाली पाटील, जयवंत वाडकर अशा अनेक कलाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त केली आहे. प्रियदर्शन जाधवने लिहिलं की, कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक…राजर्षी शाहू छत्रपतींनी १९०२ मध्ये विदेश दौरा केला होता. या विदेश दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी असणारी भव्य नाट्यगृह महाराजांनी पाहिली. अशाच पद्धतीचे नाट्यगृह आपल्या राज्यातही असलं पाहिजे आणि या नाट्यगृहांमध्ये आपल्या मातीतील कलाकारांनी त्यांची नाटकं सादर केली पाहिजेत. इथल्या लोकांना ती बघता आली पाहिजेत. म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात खासबाग म्हणून ओळखल्या जाणारे ठिकाणी एका भव्य नाट्यगृहाची उभारणी केली. हे नाट्यगृह १८१५ मध्येच बांधून पूर्ण झालं आणि या नाट्यगृहाला महाराजांनी नाव दिलं “पॅलेस थेटर” पुढे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर या नाट्यगृहाचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावानं झालं. भारतामध्ये अशी खूप कमी नाट्यगृह आहेत, की ज्यांना शतकाचा वारसा आहे…काल एक वारसा जळून खाक झाला…असो!