मराठी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार म्हणून अभिनेता भरत जाधवला ओळखलं जातं. आज यशाच्या शिखरावर असणाऱ्या भरत जाधवला एकेकाळी फार संघर्ष करावा लागला होता. चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून आपल्या हसऱ्या चेहऱ्याने भरत जाधव नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. भरत जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर जुन्या आठवणीतील एक फोटो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरत जाधवने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्यांनी त्याला हटके कॅप्शनही दिलं आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे. भरत जाधवने शेअर केलेला हा फोटो तब्बल ३० वर्षांपूर्वीचा आहे. त्यातील सर्वच कलाकार हे तरुण असल्याचे दिसत आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो महाराष्ट्राची लोकधारा या दरम्यानचा आहे.

“हा फोटो खूप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले. आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!” असे भरत जाधवने म्हटलं आहे.

“श्रेया बुगडे आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं वाटलं नव्हतं…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

भरत जाधवच्या या फोटोवर अभिनेता अंकुश चौधरीनेही कमेंट केली आहे. त्यावर कमेंट करताना अंकुशने ‘कमाल दिवस’ असे म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करताना ‘सोनेरी दिवसांची साक्ष’, असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘तुम्ही तिघांनी जी धमाल आणली मराठी सिनेमात, त्यास काही तोड नाही’, असे म्हटले आहे. दरम्यान भरत जाधवने शेअर केलेल्या या फोटोची सध्या प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. त्याची ही पोस्टही प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat jadhav shared a photo of 30 years ago with old memories nrp
Show comments