मराठी कलाकार चित्रपटांसोबतच आजही नाटकांमध्ये कार्यरत असतात. अनेक कलाकारांना याच रंगमंचावरून विशेष ओळख मिळवली होती. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता भरत जाधव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भरत रंगमंचावर ‘सही रे सही’ (Sahi Re Sahi) या नाटकाचे प्रयोग करत आहे. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने आणि उत्सुकतेने या नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावताना दिसतात. यावेळी नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी असे काही घडले की फक्त प्रेक्षक नाही तर भरतनेही खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “आम्हाला एखाद्या राक्षसासारखं…”, NCB अधिकाऱ्यासमोर बोलताना शाहरुखला झाले अश्रू अनावर

Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर

भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून एक मोठा मुद्दा नव्याने समोर आला आहे. भरत जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या चाहत्यांच्या काही ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. त्यांचा एक चाहता म्हणाला, “स्वानुभव भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटकमध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली.” हे ट्वीट शेअर करताना भरत जाधव म्हणाला, ‘नाट्यगृह व्यवस्थपन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

आणखी वाचा : अँबर हर्ड विरोधात खटला जिंकवून देणाऱ्या वकिलासोबतच जॉनी डेप रिलेशनशिपमध्ये?

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात अभिनेता भरत जाधवने आपल्या अभिनयच्या जोरावर छाप उमटवली आहे. भरत जाधव सोशल मीडियावर सक्रीय असतो. भरत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो.

Story img Loader