प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग देशभरात तिच्या कॉमेडीसाठी ओळखली जाते. सध्या ती पती हर्ष लिंबाचियासह टीव्ही शोसाठी सुत्रसंचालन करताना दिसत आहे. प्रेक्षकांना भारतीचा हा अंदाजही पसंत पडला आहे. भारतीही तिची नवी भूमिका पतीसह एन्जॉय करताना दिसते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारती सिंगनं स्वतःच्या सुत्रसंचालनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘काही लोकांना मी सुत्रसंचालन केलेलं आवडत नाही. मी करत असलेल्या कामाशी इतरांना समस्या आहेत.’ असं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी ‘डान्स दिवाने’, ‘हुनरबाज: देश की शान’ आणि ‘द खतरा शो’ यांसारख्या कार्यक्रमांसह इतर काही रिअलिटी शोदेखील एकत्र होस्ट केले आहेत. भारती सिंग लवकरच ‘सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स’ या गायन स्पर्धा रिअॅलिटी शोसाठी होस्ट म्हणून दिसणार आहे. यासाठीच तिने कपिल शर्मा शोसाठी नकार दिल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा- “सुशांतचं ‘ब्रह्मास्त्र’ संपूर्ण इंडस्ट्रीला…” बहीण मीतू सिंहची बॉलिवूडकरांवर टीका

‘इ- टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भारती सिंग म्हणाली, “बर्‍याच लोकांना माझ्या सुत्रसंचालनामुळे अडचणी येत आहेत आणि ‘मी विनोद करून इतरांचा संधी चोरत आहे असं काही लोकांना वाटतं. माझ्या विनोदांमुळे सर्वांचं लक्ष मी वेधून घेते असं सर्वांना वाटतं. पण मी कधीही असा प्रयत्न केला नाही. ते. मला कधीच कोणाला स्टेजवरून खाली आणायचे नाही. मला कोणाचीही जागा हिसकावून घ्यायची नाही.”

आणखी वाचा- Photos : भारती सिंग ते कपिल शर्मा…महागड्या गाड्यांमधून फिरतात ‘हे’ टीव्ही स्टार्स; गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल

भारती सिंग पुढे म्हणाली, “कॉमेडी ही माझी ताकद आहे आणि मी ती उत्तम प्रकारे करते, त्यामुळे जेव्हा प्रेक्षक माझी कॉमेडी माझे विनोद एन्जॉय करतात. पण काही लोकांना असे वाटतं की मी इतरांना कौशल्य दाखवण्याची संधी देत नाही, पण हे खरं नाहीये. मी फक्त माझे काम करत आहे आणि म्हणून मला माझा पती हर्षसह होस्टिंग किंवा सुत्रसंचालन करायला आवडते. इथे कोणतीही स्पर्धा नाही आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharati singh open up about her comedy and anchoring in tv shows mrj