प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. भारती सध्या तिचं मातृत्व एन्जॉय करत आहेत. मुलाच्या जन्मानंतर बरेच दिवस भारतीने त्याच्या चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. पण नंतर तिने मुलाचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होता. अलिकडेच भारतीने तिच्या मुलाचं फोटोशूट केलं आहे आणि हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण त्यावर नेटकऱ्यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारती सिंह सोशल मीडियावर मुलाचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो नेहमीच शेअर करताना दिसते. आताही तिने अशाच एका नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये भारतीचा मुलगा लक्ष्य सफेद कपड्यात खुर्चीवर बसलेला दिसत आहेत. त्याच्या क्यूट लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या फोटोंमध्ये एक अशी गोष्ट आहे जी पाहिल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. या फोटोंमध्ये भारती सिंहच्या मुलाच्या बाजूला हुक्का ठेवलेला दिसत आहे.

आणखी वाचा- Video : अखेर भारती सिंहने दाखवला लाडक्या लेकाचा चेहरा, नाव सांगत म्हणाली…

भारती सिंहच्या मुलाच्या क्यूट लुक्सनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र त्यात असलेला हुक्का मात्र नेटकऱ्यांना आवडलेला नाही. या फोटोंवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, “बाळ खूपच गोड दिसत आहे. पण हुक्का आरोग्यसाठी चांगला नाही. हे अजिबात चांगलं दिसत नाहीये.” दुसऱ्या एका युजरनं कमेंटमध्ये म्हटलंय, “बाकी सर्व तर ठीक आहे पण हा हुक्का तिथे का ठेवला आहे.” याशिवाय आणखी बऱ्याच युजर्सनी या फोटोंमध्ये दिसणाऱ्या हुक्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अर्थात हा हुक्का खराखुरा नसला तरी लहान बाळाच्या फोटोशूटमध्ये अशाप्रकारे त्याच्या वापर करणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही.

दरम्यान भारती सिंहने याआधी तिच्या मुलाचं हॅरी पॉटर लुकमध्ये देखील फोटोशूट केलं होतं. जे चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. पण आता काहीतरी हटके करण्याच्या नादात मात्र भारती सिंहचा अंदाज फसला आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर ४ वर्षांनी २०२१ मध्ये भारतीने प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये भारती सिंहनं मुलाला जन्म दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharati singh son new baby shoot netzines gave angry reaction on it mrj