टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. विनोदी अभिनेत्री भारती सिंहने मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. भारती सिंह २०१७ मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. कॉमेडियन भारती सिंह लवकरच आई होणार असल्याचे बोललं जात आहे. २०२२ मध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, भारती आणि हर्षच्या जवळील एका व्यक्तीने भारती प्रेग्नंट असल्याचे सांगितले आहे. “भारती ही प्रेग्नंसीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ती सध्या विश्रांती घेत आहे. यामुळेच तिने कॉमेडी शोसह इतर सर्व काम थांबवली आहेत. ती हल्ली जास्त वेळ घरातच घालवते. ती घराबाहेर पडणे टाळते,” असे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.

याबाबत ‘हिंदुस्तान टाईम्स’ने भारती सिंहशी संपर्क साधला असता ती म्हणाली, “गेल्या कित्येक दिवसांपासून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र मी माझ्या प्रेग्नंसीबद्दल काहीही लपवणार किंवा नाकारणार नाही. पण जेव्हा त्याबाबत योग्य वेळ येईल, तेव्हा मी उघडपणे बोलेन. अशा गोष्टी कोणीही लपवू शकत नाही. त्यामुळे जेव्हा मला याबाबत सांगायचे असेल तेव्हा मी ते नक्की सांगेन.”

हेही वाचा : “…अन् दोन सेकंद काळजात धस्स झालं”, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची भावनिक पोस्ट

दरम्यान सध्या भारती सिंह ही सुट्टीवर असली तरी लवकरच ती पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. ती लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये सहभागी होईल, असे बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’ 

सध्या भारती‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना पाहायला मिळते. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.

Story img Loader