टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला. यानंतर तब्बल तीन महिन्यांनी भारती सिंहने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे.
नुकतंच भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या युट्यूबवर एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही सांगितले आहे. या व्हिडीओत भारती म्हणते की आज तुम्ही गोला म्हणजेच माझ्या मुलाला पाहू शकणार आहात. मला याबाबत खूप मेसेज आले होते. अनेकांनी टोमणेही मारले होते. पण अखेर आज तुम्ही त्याला पाहू शकणार आहात. मी फार आनंदी आहे. सध्या तो झोपला आहे. त्याची तयारी झाल्यानंतर तुम्ही त्याला पाहू शकाल.
भारती सिंहला वाढदिवसानिमित्त पतीने दिले खास गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल
यानंतर भारती फार मजेशीर अंदाजात तिच्या मुलाचा रुम दाखवते. यात तिने तिच्या मुलासाठी ठेवलेला पाळणा, खेळणी आणि इतर अनेक गोष्टी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत भारती मुलाचे डायपर बदलतानाही पाहायला मिळत आहे. तसेच यात ती हर्षला उद्देशून गोला अगदी त्याच्या वडिलांवर गेला आहे, असेही सांगते.
या व्हिडीओच्या शेवटी फारच गोड पद्धतीने भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवतात. यासाठी त्यांनी एक मिस्ट्री बॉक्स तयार केला आहे. त्या बॉक्सच्या मदतीने त्यांनी गोलाचा चेहरा दाखवला आहे. हर्ष आणि भारतीने त्यांच्या मुलाचे नाव लक्ष असे ठेवले आहे. ते दोघेही प्रेमाने त्याला गोला असा आवाज देतात.
“It’s a…”, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी आला छोटा पाहुणा
सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’
भारतीने तिच्या प्रेग्नेसींच्या नवव्या महिन्यापर्यंत हुनरबाज कार्यक्रम होस्ट केला होता. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात होते. त्यापूर्वी भारती ही ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्षसोबत धमाल करताना दिसत आहे. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.