छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन म्हणून भारती सिंग ओळखली जाते. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचा खतरा खतरा खतरा हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही कधी सायकल चालवतांना फूटबॉल खेळला आहे का? किंवा सी सॉ खेळतांना बॉक्सिंग केलं आहे का? अशा खेळांमध्ये एक धमाकेदार ट्वीस्ट देत भारती आणि हर्ष भेटायला येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत फरहा खान फ्रायडे स्पेशल होस्ट म्हणून दिसणार आहे.
हा शो १३ मार्च २०२२ पासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७ वाजता व्हूट वर तर त्यानंतर रात्री ११ वाजता कलर्स चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या शोच्या पहिल्या भागात प्रसिध्द असे सेलिब्रिटी स्पर्धक भाग घेणार असून त्यांत करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, पुनीत पाठक आणि विशाल आदित्य सिंग दिसणार आहेत. त्याच बरोबर त्यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही असेल जी या शोचे सूत्रसंचालन करेल.
आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?
या शोमध्ये आपल्याला १५० हून अधिक मजेदार गेम्स आणि टास्क्स आणि आवडते सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या भागात आपल्याला एक ‘फरहा का चॅलेंज’ हा विशेष सेग्मेंट पहायला मिळणार आहे. या शो मध्ये अनेक सेग्मेंट्स असतील ज्यात फरहा के फनकार, डिमांड पे रिमांड, इंडिया की फटकार, अनाड़ी नं १ आणि खतरा फन मीटर यांचा समावेश असणार आहे.
आणखी वाचा : RRR च्या नव्या गाण्यात दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची झलक! पाहा Video
यावर फरहा खान म्हणते, “भारती आणि हर्शच्या विनोदी पध्दतीची एक फॅन म्हणून मला या ‘द खतरा खतरा’ शो मध्ये सहभागी होतांना खूपच आनंद वाटतो. शोची ‘फ्रायडे स्पेशल’ होस्ट म्हणून मी अतिशय उत्साहाने सेलिब्रिटीज समोर आव्हानात्मक गोष्टी ठेवतांना मला आनंद येणार आहे. ते त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाचा धक्का असेल.”
शो विषयी भारती सिंग बोलते, “हा शो इतर शो पेक्षा वेगळा असणार आहेमला खात्री आहे की ही एक प्रेक्षकांना हा शो नक्कीच आवडेल.” कृपया हमे सिरीयसली ना लें आणि ‘द खतरा खतरा शो’ पाहायला विसरु नका. हा शो १३ मार्च २०२२ पासून व्हूट आणि कलर्स वर प्रदर्शित होणार आहे.