प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. भारती सध्या तिचं मातृत्व एण्जॉय करत आहे. भारतीने कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या ती काही बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचालक म्हणून काम करताना दिसते. त्यासाठी ती अधिकाधिक मानधन देखील घेते. पण याव्यतिरिक्त ती एक उत्तम व्यावसायिक आहे.

आणखी वाचा – Viral Video : ‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर आलिया भट्टची मिमिक्री करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, तुम्हालाही हसू होईल अनावर

Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

भारतीचं स्वतःचं युट्यूब चॅनल देखील आहे. या माध्यमाद्वारे तिने पती हर्ष लिंबाचिया आणि आपल्या गोंडस मुलासह एक व्हिडीओ शेअर केला आहे. ४ वर्षानंतर पंजाब येथील अमृतसर येथे गेल्याचं भारती या व्हिडीओमध्ये सांगत आहे. तसेच पंजाबमध्ये गेल्यानंतर आपण काय काय केलं हे भारतीने सांगितलं आहे. यादरम्यानच तिने आपल्या व्यवसायाबाबत देखील सांगितलं.

पाहा व्हिडीओ

भारतीने पंजाब येथे स्वतःची एक फॅक्टरी सुरु केली आहे. मिनरल वॉटरची ही फॅक्टरी आहे. KELEBY या नावाचा मिनरल वॉटरचा तिचा ब्रँड आहे. तसेच या व्यवसायानिमित्त तिने गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. फॅक्टरीच्या आजूबाजूला असणाऱ्या गावातील लोक इथे काम करतात. गावातील लोक आपल्या फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचं पाहून भारतीला आनंद होतो.

आणखी वाचा – प्राजक्ता माळी परदेशात जाण्यामागचं कारण काय? फोटो शेअर करत म्हणाली, “अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन…”

या व्यवसायामधून भारती अधिकाधिक पैसे कमावते. इतकंच नव्हे तर तिथे तिचं छोटं रिसॉर्ट देखील आहे. भारती आपल्या मुलासह कुटुंबातील इतर मंडळींना घेऊन तिथेच राहिली होती. अमृतसरमध्येच तिचा जन्म झाला. पुन्हा एकदा आपल्या मातीमध्ये आल्यनंतर तिने खूपच धमाल-मस्ती केली. जेवणाचा आनंद लुटला. त्याचबरोबरीने तिने रिक्षा देखील चालवली.

Story img Loader