छोट्या पडद्यावरील कॉमेडि क्वीन म्हणून भारती सिंग ओळखली जाते. भारती सिंग प्रेग्नेंट आहे. सध्या भारती छोट्या पडद्यावरील ‘हुनरबाज: देश की शान’ आणि पती हर्ष लिंबाचियासोबत वूटवर असलेला ‘द खतरा शो’ होस्ट करत आहे. तर काही दिवसांपूर्वी भारतीने मुलीला जन्म दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर भारतीने अलीकडेच सोशल मीडियावरून ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
भारती आई झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह करत ही बातमी खोटी असल्याचे सांगत तिला का घाबरली आहे त्याचे कारण सांगितले आहे. तिने आपल्या चाहत्यांना सांगितले की, गूड न्यूज कधीही येऊ शकते, परंतु यासाठी लोकांनी हर्ष आणि तिच्या घोषणेची वाट पाहावी.
आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…
भारती सध्या ‘द खतरा शो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तर शूटींगमधून वेळ मिळाल्यानंतर भारतीने तिने मुलीला जन्म दिल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. “मी अजून आई झाली नाही, माझे जवळचे लोक मला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज करत आहेत. मी मुलीला जन्म दिल्याच्या चर्चा सुरु आहेत, पण हे खरं नाही. मी खतरा खतराच्या सेटवर आहे. मला १५-२० मिनिटांचा ब्रेक मिळाला, त्यामुळे मी लाइव्ह आले आणि मी अजूनही काम करत आहे”, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न तिने केला.
आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद
ती पुढे म्हणाली की, “चाहत्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्यासोबतच चाहत्यांनी तिच्या आणि हर्षच्या गूड न्यूज देण्याची वाट पाहा. मला भीती वाटते, माझी डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे. मी आणि हर्ष बाळाबद्दल बोलत राहतो, कसं असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की बाळ खूप फनी असेल, कारण आम्ही दोघेही फनी आहोत.” दरम्यान, या आधी भारतीचं प्रेग्नेसी शूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. तर भारती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.