टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. सध्या भारती ही पालकत्व एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच भारती सिंहने तिचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त हर्षने तिला फार वेगवेगळे गिफ्ट दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारती सिंह ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार व्यक्त केले होते. यावेळी तिने तिला मिळालेल्या भेटवस्तू दाखवत खुलासा केला आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला भारती सिंहने पिवळ्या रंगाची गुची-अॅडिडासची बॅग दाखवली आहे. हे तिच्या वाढदिवसानिमित्त तिला मिळालेली पहिली भेट आहे. या बॅगची किंमत जवळपास १.७ लाख रुपये आहे. त्यानंतर हर्षने तिला आणखी एक महागडे गिफ्ट दिले आहे.

हर्षने भारतीला हिऱ्याचे कानातले भेट म्हणून दिले आहेत. ही सर्व हर्षच्या मेहनतीची कमाई आहे, असेही तिने या व्हिडीओत सांगितले आहे. याची किंमत नेमकी किती? हे मात्र तिने यात सांगितलेले नाही.

सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’

भारतीने तिच्या प्रेग्नेसींच्या नवव्या महिन्यापर्यंत हुनरबाज कार्यक्रम होस्ट केला होता. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात होते. विशेष म्हणजे तिने होणाऱ्या बाळाच्या नावासाठी काही पर्याय सुचवण्यासही सांगितले होते. त्यापूर्वी भारती ही ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्षसोबत धमाल करताना दिसत आहे.

भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.