प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. भारती सध्या तिचं मातृत्व एण्जॉय करत आहे. मुलाच्या जन्मानंतर बरेच दिवस भारतीने तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. पण त्यानंतर तिने खास फोटोशूट करत मुलाचे काही क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर केले. भारतीने गरोदरपणानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या १२ दिवसांमध्येच ती तिच्या कामावर परतली. याबाबतच तिने आता खुलासा केला आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या मुलाला घरी ठेवून चित्रीकरणासाठी जाते तेव्हा नेमकं काय वाटतं? याबाबत भारतीने सांगितलं आहे. ती म्हणाली, “माझ्या मुलाचा जन्म झाला त्यानंतर लगेचच १२ दिवसांनी मी काम करण्यास सुरुवात केली. कारण चॅनलबरोबर माझा करार होता. पण लोकांनी मला ट्रोल केलं. गरोदरपणात झोपायचं कसं याबाबतही लोकांनी मला सल्ले दिले. अधिक काम करू नको, आराम कर, फक्त चप्पलच घाल, योगा कर असे अनेक सल्ले मला देण्यात आले. पण स्वतःचं शरीर किती उत्तम आहे हे आपल्यालाच माहित असतं.”

मुलाला घरी ठेवून चित्रीकरणासाठी येते तेव्हा अपराधी असल्यासारखं वाटतं का? असं भारतीला यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “माझा मुलगा घरी एकटा नसतो. त्याच्याबरोबर माझं कुटुंब, दोन घरात काम करणारी माणसं, हर्षचं कुटुंब, माझी भाची सगळे आहेत. तसेच घरी मी कॅमेरा देखील लावले आहेत. पण सध्यातरी तो घरी कुटुंबीयांबरोबर सुरक्षित आहे. म्हणूनच मला कसली चिंता वाटत नाही. त्याला घरी सोडून चित्रीकरण करणं यामध्ये मला कोणतं दुःख किंवा अपराधी असल्यासारखं वाटत नाही.”

आणखी वाचा – Video : एक्स बॉयफ्रेंडशी सुश्मिता सेनची जवळीक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ललित मोदी कुठे आहेत?”

कामच जर केलं नाही तर पैसे कुठून येणार? असं भारतीचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणाचीही पर्वा न करता घर सांभाळत भारती लगेच आपल्या कामावर रुजू झाली. तिच्यासाठी देखील हे नवं आयुष्य आहे. पण आपलं काम सांभाळत ती पत्नी, आई ही जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळते.

Story img Loader