दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे प्रेक्षक वळत असल्याचे पाहता आता अनेक चित्रपट हे हिंदीत देखील प्रदर्शित होत आहेत. अशात आता आता पॉवरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवन कल्याण यांचा ‘भीमला नायक’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे. त्यावर आता चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामगोपाल वर्मा हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता त्यांना भीमला नायक आणि पुष्पा या चित्रपटाची तुलना केली आहे. राम गोपाल वर्मा ट्वीट करत म्हणाले, ” ‘भीमला नायक’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होतोय ही आनंदाची बातमी आहे आणि आता पवन कल्याण पॅन इंडियाला सिद्ध करू शकतात की त्यांचा चित्रपट ‘पुष्पा’ पेक्षा मोठा आहे आणि ते अल्लू अर्जुन पेक्षा मोठे कलाकार आहेत.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

दरम्यान, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. दुसरीकडे ‘भीमला नायक’ हा चित्रपट जवळजवळ तयार असून एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पवन कल्याणसोबत राणा दग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bheemla nayak in hindi ram gopal varma says pawan kalayn can prove his film is bigger than pushpa and he s bigger than allu arjun dcp