रमाबाई म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह रमाबाई त्यांच्यापाठीशी सावली प्रमाणे उभ्या राहिल्या. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेने आणि प्रेमाने पाळलं. रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा अध्याय स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत सुरु होतोय. याच अध्यायातलं पहिलं पान म्हणजे रामी आणि भीवाचा विवाह. भीवा १४ वर्षांचा आणि रामी ९ वर्षांची असताना दोघं विवाहबंधनात अडकले. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पुढील संपूर्ण आठवडा रात्री ९ वाजता हे विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येतील.

भीवाच्या कर्तुत्वाबद्दल रामीला कल्पना असली तरी लग्नापूर्वी दोघांची भेट झाली नव्हती. त्याकाळी तशी प्रथाच नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या पतींना पाहण्यासाठी रामी आतुर झाली होती. हे हळवे क्षण मालिकेतून टिपण्यात आले आहेत. अगदी उखाण्यापासून, गृहप्रवेश, नव्या घरात जुळवून घेण्याचा रामीचा प्रयत्न हे भावनिक प्रसंग मालिकेतून पहायला मिळतील. मृण्मयी सुपाळ या मालिकेत बालपणीच्या रमाईंची भूमिका साकारते आहे.

Seven hundred women cheated, Mudra loan, case against a woman,
मुद्रा लोनच्या नावाखाली सातशे महिलांना २५ लाखांस गंडविले, सोलापुरात भामट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
9 years old girl molested by luring chocolates in kalamboli
पनवेल : कळंबोलीत चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार
Dhammachakra Pravartan Din, Deekshabhoomi Nagpur,
नागपुरात लोटला भीम सागर, निळ्या रंगाच्या सम्यक पताकांनी सजली दीक्षाभूमी
Ratan Tata Newspaper vendor
Ratan Tata: गरिबांचा कैवारी! रतन टाटांनी जेव्हा पेपरवाल्याला केली होती ५ लाखांची मदत, २० वर्ष घरी वर्तमान पत्र देणाऱ्याने सांगितली आठवण
Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
A five year old boy was molested by minors Pune print news
पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीनांकडून अत्याचार
A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!

१९०७ साली रमाबाई आणि भीमरावांचा विवाह सोहळा भायखळा येथील मासळी बाजारात पार पडला. तो काळ जसाच्या तसा उभा करण्याचा प्रयत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या संपूर्ण टीमने केलाय. बाबासाहेबांच्या विवाहाप्रसंगी तुफान पाऊस असल्याचा संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहे. योगायोग असा की ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत विवाहप्रसंग शूट होत असतानाही मुसळधार पाऊस होता. मात्र संपूर्ण टीमच्या योग्य नियोजनामुळे शूटिंग निर्विघ्नपणे पार पडलं. कलाकारही उत्साहाने या सोहळ्याचा आनंद घेत होते. भीवाच्या वडिलांची म्हणजेच रामजी बाबांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद अधिकारी यांनी चाफ्याच्या फुलापासून अंगठी बनवत सर्व कलाकारांना खास भेट दिली. पडद्यावर दिसणाऱ्या या कुटुंबाचं खऱ्या आयुष्यातही घट्ट नातं बनलंय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या निमित्ताने कलाकार म्हणून समृद्ध होता येतंय हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे.