अभिनेते, गायक यांच्यावर भर कार्यक्रमात अनेकदा विचित्र प्रकार घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी गायक कैलाश खेर कर्नाटकमध्ये गाण्याच्या कार्यक्रम करत असताना त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. असाच एका प्रकार भोजपुरीमधील एका गायकाबरोबर घडला आहे.

पवन सिंह हा भोजपुरी चित्रपटसृष्टीतील उत्तम गायक आणि अभिनेता मानला जातो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्यावर प्रेक्षकांनी दगडफेक करण्यात आली. काल देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र या सणाला उत्तर प्रदेशात गालबोट लागले. उत्तर प्रदेशमधील बालिया जिल्ह्यात पवन सिंहचा कार्यक्रम सुरु होता. तेव्हा प्रेक्षकांमधून एकाने गायकाला दगड मारला. त्यामुळे एकाच गदारोळ निर्माण झाला आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Prime Minister Narendra Modi visiting Ganapati puja at the home of Chief Justice of India Dhananjay Chandrachud
‘व्यक्तिगत’ पूजा- आरतीचे जाहीर प्रदर्शन झाल्यानंतर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू

‘पठाण’च्या यशानंतर दीपिका पदुकोणने ‘प्रोजेक्ट के’साठी आकारली ‘इतकी’ रक्कम; मानधनाचा आकडा ऐकून व्हाल थक्क

पवन सिंहचा कार्यक्रम सुरु असताना प्रेक्षकांमधून त्याला विशिष्ठ गाणे गाण्यास सांगितले जे एका जातीवरचे होते. प्रेक्षकांच्या या विनंतीला त्याने नकार दिला. अखेर प्रेक्षकांनी संपातून त्याच्यावर दगड भिरकावला. संतापलेल्या प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी पोलिसांना कठोर पाऊले उचलावी लागली. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ हा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. सोशल मीडियावर सध्या गायकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पवन सिंह एक प्रसिद्ध गायक असून त्याने ‘जिद्दी’, आशिक, ‘लोहा पहलवान’, ‘त्रिदेव’, प्रतिज्ञा, ‘संग्राम’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. १९९७ मध्ये त्यानं गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केलेली. भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यानं अनेक हिट अल्बम्स दिले आहेत.