भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीमध्ये पवन सिंहचं नाव टॉपला आहे. तो एक उत्तम गायकही आहे. पवन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याची पत्नी ज्योती सिंहने पवनवर गंभीर आरोप केले आहेत. ज्योती ही त्याची दुसरी पत्नी आहे. पण लग्नानंतर आपल्या घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. यामुळे आता पवन अडचणीत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मुलाबरोबरच महेश मांजरेकरांनी लेकीलाही दिली काम करण्याची संधी, लूक समोर

नेमकं प्रकरण काय?
पवनच्या पत्नीने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहे. ‘आजतक’च्या वृत्तानुसार ज्योती सिंहने पवन सतत छळ तसेच मारहाण करत असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर ज्योतीच्या कुटुंबियांकडून त्याने ५० लाख रुपये घेतले असल्याचंही तिचा आरोप आहे. पवनने गर्भपात करण्यास मला भाग पाडलं तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असंही ज्योतीचं म्हणणं आहे.

ज्योती सिंहने बलिया शहर पोलिस ठाण्यामध्ये पवन सिंह आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सध्या तरी पोलिस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. नशेमध्ये पवन मला मारायचा तसेच शिवीगाळ करायचा असं ज्योतीचं म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर त्याचे कुटुंबियही ज्योतीला मानसिक त्रास द्यायचे.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

ज्योती जेव्हा गरोदर होती तेव्हा तिला गर्भपाताच्या गोळ्याही देण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. पवनच्या पहिल्या पत्नीने तर लग्नानंतर सहा महिन्यातच आत्महत्या केली. पण या सगळ्या प्रकरणावर सध्यातरी पवनने न बोलणंच पसंत केलं आहे.