लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) गळफास घेत आत्महत्या केली. हॉटेलमधील रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. आकांक्षाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आकांक्षा व भोजपुरी गायक, अभिनेता समर सिंहबरोबरच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकांक्षाच्या मृत्यूनंतर तिचा कथित बॉयफ्रेंड समर सिंहवर कुटुंबियांनी आरोप केले आहेत. समर सिंह व त्याचा भाऊ संजय सिंहने २१ मार्चला आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी तिचं कोटी रुपयांचं मानधनही दिलं नसल्याचा आरोप आकांक्षांच्या आईने केला होता. त्याचबरोबर आकांक्षाची हत्या झाल्याचा संशय व्यकत करत त्यांनी समर सिंह व त्याच्या भावावर आरोप केले होते. आता आकांक्षा व समर सिंह यांच्यातील रिलेशनशिपबाबत कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> “समर सिंह आणि त्याच्या भावाने हत्या केली” २५व्या वर्षी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दुबेच्या आईचे गायकावर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्याने २१ मार्चला…”

आकांक्षा व समर सिंह लिव्ह इनमध्ये राहत असल्याची चर्चा होती. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी पीटीआयशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आकांक्षा व समर सिंह लिव्ह इनमध्ये राहत नव्हते. त्यांच्यात असं काहीच नातं नव्हतं. समर सिंह तिच्या मागे लागला होता. जेव्हा आकांक्षाने त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा त्याने या अफवा पसरवण्यास सुरुवात केली. आकांक्षा शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिच्याबरोबर फार बोलणं व्हायचं नाही. परंतु, तिच्या आईबरोबर ती व्हिडीओ कॉलवर बोलायची”, असं तिच्या मावशीने म्हटलं आहे.

हेही वाचा>> “रात्री पार्टीला गेली, सकाळी १० वाजता…” आकांक्षा दुबेच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं? अभिनेत्रीच्या हेअर आर्टिस्टने सांगितला घटनाक्रम

दरम्यान, आकांक्षा व समर सिंह एकमेकांना डेट करत होते. दोघांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. या दोघांनी अनेक भोजपुरी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri actress akanksha dubey suicide case family clarify that samar singh and actress were not in live in relationship kak