भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहे. आकांक्षा दुबेने रविवारी २६ मार्च रोजी वाराणसी इथं हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येस भोजपुरी गायक समर सिंह याला कुटुंबाने जबाबदार ठरवलं आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. आता तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही दिवसांपूर्वी आकांक्षाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला होता. त्यानंतर आकांक्षाचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तिच्या वकिलांनी आणखी एक खुलासा केला आहे. आकांक्षाने मृत्यूपूर्वी तिच्या मित्रांसोबत ब्रेकअप पार्टी साजरी केली होती, असा दावा शशांक त्रिपाठी यांनी केला आहे.
आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

“आकांक्षाने या ब्रेकअप पार्टीसाठी ११ हजार रुपये खर्च केले होते. या पार्टीचे संपूर्वी बिलही आकांक्षानेच भरले. ती एका पबमधून बाहेर पडत असल्याचे सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात ती या पबमधून बाहेर पडताना दिसत आहे. आकांक्षाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, असा उल्लेख करण्यात आला आहे. याचा अर्थ मृत्यूपूर्वी तिने काहीही खाल्ले नव्हते”, असेही त्यांनी म्हटले.

आणखी वाचा : प्रसिद्ध इन्स्टा स्टारच्या व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरणीच्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट, म्हणाला “देव तुला…”

दरम्यान आकांक्षा दुबेने २६ मार्च रोजी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येस भोजपुरी गायक समर सिंह जबाबदार असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. आकांक्षाच्या मृत्यूनंतर समर सिंह आणि त्याचा भाऊ बेपत्ता आहेत. सध्या पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

Story img Loader