भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह ही सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चित्रपटांबाबत तसेच खाजगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. इन्स्टाग्रामवर तर तिचे हजारो चाहते आहेत. अक्षराने नव्या लुकमधील एखादा फोटो, व्हिडीओ शेअर केला की काही तासांमध्येच तिच्या या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतो. एकूणच काय तर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी ती नेहमीच सज्ज असते. आता असाच एक सुंदर आणि आकर्षक व्हिडीओ तिने तित्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षराने चक्क लावणी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि यामधील तिचं रुप पाहून नेटकरीही अवाक् झाले. तिने साडी परिधान करून अगदी मराठमोळ्या अंदाजामध्ये लावणी केली. अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ चित्रपटामधील लावणीवर तिने नृत्य केलं. हा व्हिडीओ शेअर करत असताना तिने म्हटलं की, “काहीतरी नवीन आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल. तुम्ही मला प्रेम, प्रोत्साहन दिलंत तर आणखी नवीन काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करेन.”

अक्षराचा हा लावणी व्हिडीओ नेटकऱ्यांना देखील प्रचंड आवडला आहे. तिचं मराठी गाण्यांप्रती असणारं प्रेम आणि ठेकेदार लावणी पाहून सगळेच जण अक्षराचं कौतुक करत आहेत. अक्षराने या व्हिडीओमध्ये साडी, केसात गजरा आणि दागिने परिधान केलेले दिसत आहेत. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तर क्या बात…खरंच भोजपुरी अभिनेत्रीने लावणीवर इतका परफेक्ट ठेका धरणं कौतुकास्पदच आहे.

आणखी वाचा – प्रतिक्षा संपली! लवकरच ‘मिर्झापूर’चं तिसरं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अक्षराने असे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. तिचा हा नवा लुक प्रेक्षकांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे. अक्षराला ही लावणी कोरियोग्राफर निशांत भट्टने शिकवली आहे. निशांतबरोबरचे फोटो शेअर करत तिने त्याचे देखील आभार मानले आहेत.