सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंग सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हिंदी ‘बिग बॉस’मुळे अक्षरा अधिक नावारुपाला आली. भोजपुरीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अक्षराच्या नावाचाही समावेश आहे. पण काही दिवसांपूर्वीच तिचा एक खासगी एमएमएस व्हि़डीओ सर्वत्र व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी ती व्यक्ती अक्षराच आहे असं बोललं जात होतं. आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणाबाबत तिने आपलं मत मांडलं आहे.

अक्षराने इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह येत या प्रकरणाबाबत चाहत्यांनी संवाद साधला. ती यावेळी म्हणाली, “मी माझ्या कामामध्ये इतकी व्यग्र असते की सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांकडे माझं लक्षच नसतं. पण मला काही लोकांनी सोशल मीडियाद्वारे या खोट्या एमएमएसची लिंक शेअर केली. ती लिंक पाहून मी हैराण झाले.”

पुढे ती म्हणाली, “कृपया काही पैसे मिळवण्यासाठी असं करू नका. तुम्ही अशाप्रकारचं कृत्य करून माझ्यासाठी नव्हे तर तुमच्या आई-बहिणींसाठी वाईट काम करत आहात. तुमच्या आई-बहिणींबरोबर असं कधीच होऊ नये अशी मी प्रार्थना करते.” अक्षराला यावेळी राग अनावर झाला होता. शिवाय तिने स्पष्ट शब्दांमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “अरे ए किरण माने तुला…” अपूर्वा नेमळेकरची दादागिरी सुरुच, राग अनावर झाला अन्…

इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत अक्षराने म्हटलं की, “मुलींचा आदर करा. तुमच्या भीतीपोटी मी लाइव्ह आलेली नाही. सामान्य मुलींना कोणताच त्रास होऊ नये म्हणून मी लाइव्ह आलेली आहे.” व्हायरल एमएमएस व्हिडीओ तिचा नसल्याचं अक्षराच्या बोलण्यामधून स्पष्ट होतं.

Story img Loader