मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दोन गोष्टींची संख्या सतत वाढत आहे, एक म्हणजे अनेक प्रकारचे चित्रपट आणि नायिका (त्या देखिल अनेक प्रकारच्या म्हणायच्या का?)
असे असूनही दिग्दर्शक राजू पार्सेकर याला ‘सत ना गत’ चित्रपटासाठी भोजपुरी चित्रपटाची नायिका पाखी हेगडे हिची निवड करावी लागली, असे का? यावर राजू सांगतो, राजन खानच्या कादंबरीनुसार चित्रपटात काही धाडसी प्रसंग आहेत ते साकारण्यात मराठी नट्यांची हिंमतच होईना. खरं तर, अभिनयाचा एक भाग म्हणूनच ते साकारायचे असते, पण ‘तशा’ दृश्याने आपली प्रतिमा बिघडेल अशी त्यांना भीती वाटली, म्हणून मी पाखीची निवड केली. ती माराठी छान बोलत असल्याने कसलीही अडचण नव्हती. राजूच्या बोलण्यात व्यथा आणि कथा देन्ही आढळल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा