भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने बनारसमधील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांसह अनेक भोजपुरी तारे दु:खी झाले आहेत. भोजपुरीतील सर्व बड्या स्टार्सनी आकांक्षा दुबेला आदरांजली वाहिली. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीची एक पोस्ट समोर आली आहे. ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.
राणी चॅटर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टद्वारे भोजपुरी इंडस्ट्रीचा खुलासा केला आहे. राणीने लिहिले की, ‘प्रत्येकाला सगळं माहिती आहे, परंतु कोणीही काहीही बोलणार नाही प्रत्येकाला मुलगी हवी आहे, प्रेमसंबंध हवे आहे, तिच्यासोबत फिरायला जायचे आहे. मात्र, जेव्हा त्या मुलीबरोबर तुमचं नाव जोडलं जातं. तेव्हा मात्र, तुम्हाला तिच्यापासून लांब पळायचे असतं कारण तुम्हाला नवी मुलगी हवी असते. ज्या मुलीला आपण घेऊन फिरत असतो तिची लग्न करण्याची इच्छा असते. मुलींना हे समजणे गरजेचे आहे की त्यांचा फक्त वापर केला जातो. आमच्या इंडस्ट्रीत माणसं भरपूर आहेत पण खरे पुरुष कमी आहेत.
राणीने पुढे लिहिले, मुलींनी, विशेषत: भोजपुरीमध्ये काम करण्यासाठी आलेल्यांनी काळजी घ्या. इथे कोणी प्रेम करत नाही. त्यांना तुमच्याबरोबर चार गाणी करायची आहेत. तुमच्या भावनांचा त्यांना आदर नाही. चार गाणी केल्यावर तुम्ही म्हातारे व्हाल मग ते नवीन कोणीतरी शोधतील. एक-दोन सोडले तर इथले सगळे लोक एकमेकांबरोबर नाहीत. आकांक्षा दुबेच्या निधनाने राणी चॅटर्जीला खूप दुःख झाले आहे. त्यामुळे त्यांनी ही पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे.