एका भोजपुरी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरील मित्रावर बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत. त्या मित्राने हॉटेलमध्ये मुलाखतीच्या बहाण्याने बोलावलं होतं, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. ही भोजपुरी अभिनेत्री सध्या दिल्लीत राहते, अशी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिनिलीयाला मिळालेला नाव बदलण्याचा सल्ला, ‘हे’ सुचवलेलं नाव; म्हणाली, “मला प्रत्येकजण…”

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडितेचे इन्स्टाग्राम हँडलवर खूप फॉलोअर्स आहेत. तिथे ती नियमितपणे तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल अपडेट देत असते. अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटलंय की ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून महेश नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती, ज्याने तिला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याची ऑफर दिली. २९ जून रोजी त्याने अभिनेत्रीला मुलाखतीच्या बहाण्याने गुरुग्राममधील उद्योग विहार परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावले.

जावेद अख्तर व त्यांच्या दोन्ही पत्नी, फरहान, त्याच्या दोन्ही पत्नी अन्…, अख्तर कुटुंबाचा फॅमिली फोटो व्हायरल

तिने पुढे खुलासा केला की जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा महेशने आधीच एक खोली बुक केली होती, तो तिला तिथे घेऊन गेला. तिला काही प्रश्न विचारल्यानंतर त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. ती निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने जबरदस्ती केली आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला जीवे मारण्याची आणि तिचे खासगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करण्याची धमकी दिली, असाही आरोप तिने केला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दल वृत्त दिलंय.

प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…

तक्रारीनंतर महेशविरोधात उद्योग विहार पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (कॉमन इंटेन्शन) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.