अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भोजपुरी गायक अभिषेक उर्फ बाबुल बिहारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आक्षेपार्ह फोटो ऑनलाइन शेअर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची पोलिसांनी चौकशी केली.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन वर्षांपूर्वी घडलेली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला बाबुल बिहारीने मोहात पाडून राजीव नगर येथील एका हॉटेलमध्ये नेलं होतं. त्यानंतर त्या मुलीचे काही आक्षेपार्ह फोटोही त्याने काढले होते. त्यानंतर पीडित मुलीने बाबुल बिहारीशी संपर्क तोडला होता. तिच्या कुटुंबीयांना याबाबत काहीच माहिती नव्हती.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक

हेही वाचा>> संत तुकारामांची पालखी सजवणाऱ्या ‘त्या’ मुस्लीम बांधवांसाठी किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “कमरभैय्यांसह इम्रान शेख…”

बाबुल बिहारीने दोन वर्षांनंतर मुलीचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत तिला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत बाबुल बिहारीविरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत बाबुल बिहारीला बुधवारी(७ जून) अटक केली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

कोण आहे बाबुल बिहारी?

बाबुल बिहारी हा भोजपुरी गायक आहे. त्याचं खरं नाव अभिषेक असं आहे. बिहारमध्ये वास्तव्यास असलेल्या बाबुल बिहारीचं युट्यूब चॅनेलही आहे. इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये त्याने गायक व अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader