बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. आगामी काळात त्याच्याकडे काही चित्रपट आहेत. मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती त्याच्या बहुचर्चित ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाची. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

या चित्रपटाचा टीझर एवढा धमाकेदार आहे की प्रेक्षकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टीझरची सुरुवात लोकप्रिय गाणं ‘आमी जे तुम्हारो’ने होताना दिसते. त्यानंतर एक जुनी हवेली पाहायला मिळते आणि पाहता पाहता अचानक एक भयंकर चेहरा समोर येतो. यानंतर कार्तिक आर्यनची एंट्री होते. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, डोक्याला बांधलेला रुमाल, कुर्ता घातलेल्या कार्तिकचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. यासोबतच त्याच्यासोबत राजपाल यादवची झलकही पाहायला मिळते.

आणखी वाचा- Video : आलिया सर्वांसमोर रणबीरसोबत असं वागली की सगळीकडे झाली होती चर्चा

चित्रपटाचा टीझर ५३ सेकंदांचा आहे. यात कार्तिकचा लुक पाहायला मिळाला असला तरी कियाराच्या लुक आणि भूमिकेबद्दल मात्र सस्पेन्स कायम आहे. पण हा टीझर सर्वांना अक्षय कुमारच्या ‘भूलभुलैय्या’ची आठवण करून देतो. ‘भूलभुलैय्या २’ हा २०२२ मधील सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला चित्रपट आहे. खरं तर हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या संकटानंतर चित्रपटाचं शूटिंग रखडलं.

आणखी वाचा- “त्यापेक्षा मी माझ्याच भाषेत…” हिंदी कलासृष्टीत काम करण्याच्या प्रश्नावर प्रसाद ओकचं सडेतोड उत्तर

‘भूलभुलैय्या २’ येत्या २० मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader