बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मागच्या बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. आगामी काळात त्याच्याकडे काही चित्रपट आहेत. मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती त्याच्या बहुचर्चित ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाची. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची मुख्य भूमिका असेलल्या या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडाचं जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळाणार आहे. ३ मिनिटं आणि १६ सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात लोकप्रिय गाणं ‘आमी जे तोमार’ने होते. त्यानंतर थोडं भीतीदायक वातावरण तयार होतं आणि मग एंट्री होते ती १५ वर्षांनी परत आलेल्या मंजुलिकाची. जी काळी जादू करण्यात निपुण आहे. त्यानंतर कार्तिक आर्यनची एंट्री होते जो मंजुलिकाला पकडण्यासाठी आलेला आहे. पण नंतर तो घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेलाही दिसतो. या ट्रेलरमध्ये कार्तिक- कियारामधील लव्ह अँगलही दाखवण्यात आला आहे.

आणखी वाचा- यशला KGF करायचा नव्हता हिंदी भाषेत प्रदर्शित पण… वाचा नेमकं काय घडलं

आणखी वाचा- ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीआधी अभिनेत्रीनं केला डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

पण या सोबतच या कथेत एक ट्वीस्ट देखील आहे. एकीकडे कार्तिक आर्यनला मंजुलिका ही कियारासारखी दिसते. तर दुसरीकडे तो स्वतःच्याच रुपातील मंजुलिकाला पाहून हैराण झालेला दिसतो. याशिवाय ट्रेलरमध्ये राजपाल यादव आणि संजय मिश्रा यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसायला भाग पाडलं आहे. ‘भूलभुलैय्या २’ येत्या २० मे ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Story img Loader