बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला हॉरर-विनोदीपट ‘भूतनाथ रिटर्न्स’ने चांगली सुरूवात केली असून, बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापासून तीन दिवसांत १८.०२ कोटीचा गल्ला जमवला आहे. जरी पहिल्याच दिवशी ४.०७ कोटीचा धंदा करीत चित्रपटाने संथ सुरुवात केली असली, तरी आठवड्याच्या शेवटाला चित्रपटाने जोर पकडला. चित्रपट समीक्षक आणि चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीवर भाष्य करणारे तरण आदर्श यांचे भूतनाथ रिटर्न्स चित्रपटाच्या कामगिरीबाबतचे टि्वट – #BhootnathReturns शुक्रवार ४.०७ कोटी, शनिवार ५.८५ कोटी, रविवार ८.१० कोटी एकूण १८.०२ कोटी निव्वळ. भारतीय बाजारातील कामगिरी… आठवड्याच्या शेवटाला उत्तम कामगिरी.
चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असलेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, किशन कुमार, रवि चोप्रा यांनी एकत्रितरित्या केली असून, अजय कपूर हे सह-निर्माता आहेत. ‘भूतनाथ रिटर्न्स’ हा २००८ सालच्या ‘भूतनाथ’ चित्रपटाचा सिक्वल आहे. ‘भूतनाथ’ चित्रपटातदेखील अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता. ‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर पार्थ भालेराव आणि बोमन इराणी यांच्यादेखील भूमिका आहेत.