मागच्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड चित्रपटामध्ये बरेच बदल झाले आहेत. आता पूर्वीप्रमाणे लव्ह स्टोरी पाहिल्या जात नाही. त्यापेक्षा एखाद्या विशिष्ट विषयावर आधारित असलेले चित्रपट उत्तम चालत असल्याचं पाहायला मिळतं. ज्या मुद्द्यांवर बोलण्याची लोकांना लाज वाटते किंवा ज्यावर बोलणं टाळलं जातं अशा विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याचं प्रमाण आता बॉलिवूडमध्ये वाढलं आहे. त्यामुळे थोडं वेगळेपण असलेली भूमिका साकारताना कलाकारही मागे पुढे पाहत नाहीत. असंच काहीसं भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट ‘बधाई दो’च्या बाबतीत घडलं आहे. या चित्रपटात भूमी एका लेस्बियन मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘बधाई दो’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. विशेषतः या चित्रपटातील भूमी पेडणेकरच्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर बोललं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती भूमीनं तिच्या या भूमिकेविषयी सांगितलं आहे. या सोबतच ही भूमिका साकारण्यामागचं कारणही तिनं स्पष्ट केलं आहे.

ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Raveena Tondon And Govinda
“…तर मी तुझ्याबरोबर लग्न केले असते”, गोविंदा व रवीना टंडनबाबत सुनिता आहुजा म्हणाल्या, “मी तिला सांगितले…”
maddcok universe new release date stree 3 munjya 2
ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…
Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लेस्बियन भूमिकेविषयी बोलताना भूमी म्हणाली, ‘मी जेव्हा चित्रपटाला होकार दिला तेव्हा माझ्या मनात कोणतीच शंका नव्हती. मी एक अभिनेत्री आहे आणि या चित्रपटात मी एक वेगळी भूमिका साकारत आहे. मग या भूमिकेसारख्या असलेल्या लोकांनीच ती भूमिका का साकारावी? मी खूप मेहनत घेतली आहे. माझ्याकडे कौशल्य आहे, तर मग मी ही भूमिका का साकारू नये? असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळेच भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला.’

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील विषय हे बॉलिवूडपेक्षा चांगले आहेत असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर भूमी म्हणाली, ‘मला असं वाटत नाही. कारण आज आपली बॉलिवूड इंडस्ट्री पॅन इंडियन झाली आहे. असे बरेच हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमाल केली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांबद्दल असं बोलणं चुकीचं ठरेल.’

दरम्यान भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘बधाई दो’ येत्या ११ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णीनं केलं असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता आहे.

Story img Loader