बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांचा नुकताच ‘बधाई दो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे, तर काहींना हा चित्रपट आवडलेला नाही. या चित्रपटातील भूमीने साकरलेल्या भूमिकेची चर्चा तर सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. या चित्रपटात भूमी एका लेस्बियन मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेवर भूमीच्या आईची काय प्रतिक्रिया होती हे तिने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूमीने या चित्रपटात लेस्बियन मुलीची भूमिका साकारली आहे. ती एका मुलीवर प्रेम करत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. पण कौटुंबिक दबावामुळे ती एका पोलिसाशी म्हणजे राजकुमार रावशी लग्न करते. चित्रपटात भूमी एका मुलीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. दरम्यान, भूमीने तिची आई सुमित्रा यांची या भूमिकेवर कशी प्रतिक्रिया होती ते सांगितले आहे.

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

आणखी वाचा : “मी उघड्यावर शौचाला बसलो आणि मागे वळून पाहतो तर हॉलिवूडचे…”, करण जोहरने सांगितला ‘तो’ लाजिरवाणा किस्सा

भूमीने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत भूमीने तिच्या आईची प्रतिक्रिया सांगितली आहे. ‘बधाई दो हा माझा असा चित्रपट आहे, जो कुटुंबासोबत पाहायला हवा. या चित्रपटात प्रेम आणि त्याला मिळणारी स्वीकृती साजरी करण्यात आली आहे. “हा चित्रपट मी माझ्या आईच्या शेजारी बसून पाहिला आहे. त्याआधी तिने मला कोणत्या मुलीसोबत रोमान्स करताना पाहिले नव्हते. चित्रपट संपल्यानंतर मी तिला विचारले की, मला एका मुलीसोबत रोमान्स करताना पाहून तिला काही वेगळे वाटले का? यावर उत्तर देत अजिबात नाही, असे उत्तर आईने दिले,” असे भूमी म्हणाली.

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

बधाई दो या चित्रपटात भूमीची एका फिजिकल एज्युकेशनच्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे मुख्य भूमिकेत आहेत. तर या चित्रपटात सीमा पाहवा, चुम दरंग, शीबा चढ्ढा, नितीश मिश्रा आणि लवलीन मिश्रा यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumi pednekar revealed her mother reaction on her movie badhai do dcp