चार वर्षांपूर्वी ‘पिंजरा’ या मालिकीद्वारे भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या समोर आली. या मालिकेनंतर हे दोघेही चित्रपटांमध्ये झळकले. मात्र, त्यांनी एकही चित्रपट एकत्र केला नाही. पण, आता हे दोघेही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
सामाजिक विषयावर आधारित ‘निवडुंग’ या चित्रपटात भूषण आणि संस्कृती काम करणार आहेत. विशेष म्हणजे या दोघांसोबत पिंजरामध्ये झळकलेली अभिनेत्री सारा श्रवण हीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. मीना शमिम फिल्म्स या बॅनरअंतर्गत बनत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन मुनावर भगत करत आहे.  या चित्रपटाच्या चित्रीकरणास या आठवड्यात सुरुवात करण्यात येईल. भूषण, संस्कृतीसह अस्ताद काळे, प्राजक्ता दिघे आणि शेखर फडके यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा