सोशल मीडियावर जागतिक महिला दिन साजरा होत असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील खास महिलांना शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले आहेत.

यात बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील एक खास फोटो शेअर केलाय. बिग बी कायमच सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधत असतात. कोणताही खास दिवस किंवा सण असो ते चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाहित. आजही महिला दिनाच्या निमित्ताने बिग बी यांनी त्यांच्या आयुष्यात खास स्थान असलेल्या महिलांचा फोटो शेअर केला आहे.

बिग बींनी महिला दिनानिमित्तानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक कोलाज फोटो शेअर केलाय. या कोलाजमध्ये त्यांच्या दिवंगत आई तेजी बच्चन यांचा फोटो आहे. त्याचंसोबत पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, नात नव्या नंदा यांचे फोटो दिसत आहेत. तसचं सून एश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या य़ांचे देखील काही खास फोटो या कोलाजमध्ये आपण पाहू शकतो. बिग बींच्या या फोटोला काही तासातचं पाच लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत.

बिग बींनी या फोटोला कॅप्शनही दिलंय. “असं म्हणतायत आज महिला दिवस आहे. फक्त एक दिवस? नाही ..दररोज महिला दिन” असं कॅप्शन देत त्यांनी दररोजच महिला दिन साजरा करावा असं म्हंटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्या डोळ्याची सर्जरी झाली होती. सर्जरीनंतर त्यांनी चाहत्यांसोबत एक कविता शेअर केली होती. त्यांनी त्यांची परिस्थिती या कवितेतून सांगितली होती. “मी दृष्टिहिन असलो तरी दिशाहिन नाही.” त्यांनी आपल्या चाहत्यांचे आणि घरच्यांचेही त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या काळजीबद्दल या कवितेच्या माध्यमातून आभार मानले होते.

Story img Loader