बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये स्पर्धकांना प्रोस्ताहन देण्यासोबतच प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अनेकदा बिग बी शोमध्ये त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या कविता देखील ऐकवत असतात. बिग बींच देखील हिंदी भाषेवर चांगलच प्रभूत्व आहे. शो असो किंवा एखादी मुलाखत बिग बी अनेकदा हिंदीतूनच संवाद साधत असतात. नुकतीच बिग बींकडून मात्र हिंदीमध्ये शेअर केलल्या पोस्टमध्ये एक चूक झाली आहे. तर त्यांच्याच एका चाहत्यांने ही चूक बिंग बींच्या ध्यानात आणून दिली आणि बिंग बींनी त्याबद्दल माफी देखईल मागितली.
पटनातील तरुण राजेश पांडेने फेसबुकवर बिग बींनी केलेल्या एका पोस्टवर कमेंट करत त्यांना चूक लक्षात आणून दिली. बिग बी आणि या तरुणातील चॅट आता चांगलच व्हायरल होवू लागलं आहे. या तरुणाने बिग बींना त्यांनी दसऱ्याला दिलेल्या शुभेच्छामंध्ये चूक दाखवून दिलीय. ‘दशहरा’ आणि ‘पेशेवर’ हे दोन शब्द अशुद्ध लिहिले असल्याचं त्याने कमेंटमध्ये सांगितलं. बिग बींनी ‘दशहरा’ लिहिण्याएवजी ‘दशहेरा’ लिहिलं होतं. तसचं राजेशने बिंग बींच्या एका जुन्या सिनेमातील डायलॉगमध्ये देखील चूक होती हे निदर्शनास आणून दिलं. ”खुदा गवाह” या सिनेमात बिंग बींनी ‘पेशेवर मुजरिम’ म्हणण्याएवजी ‘पेशावर मुजरिम’ म्हंटलं होतं असे त्याने ध्यानात आणून दिलं.
…आणि त्याची कहाणी ऐकून रणवीर सिंहच्या अश्रूंचा बांध फुटला
तर बिग बींनी देखील या तरुणाच्या कमेंटी दखल घेतली आहे. त्यांनी झालेल्या चूकी बद्दल माफी मागत पुढे चूक सुधारणार असल्याचं म्हंटलंय. तसचं चूक लक्षात आणून दिल्याबद्दल या तरुणाचे आभार देखील मानले आहेत.