बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अनेक जुने किस्से व्हायरल होत आहेत. असाच एक किस्सा अभिनेत्री माधुरी दिक्षीतच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये घडला होता. माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नाही, शिवाय ते परदेशात राहायचे, त्यामुळे बॉलिवूड कलाकारांविषयी त्यांना फार माहिती नव्हती. माधुरी आणि डॉ. नेने यांच्या रिसेप्शनला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी डॉ. नेनेंनी बिग बींना पाहताच “यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय” अशी प्रतिक्रिया दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Photos : ८० वर्षांचे झाले महानायक अमिताभ बच्चन; पाहा त्यांचे न पाहिलेले पडद्यामागचे फोटो

माधुरीने ‘Rendezvous with Simi Garewal’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माधुरीने ही गोष्ट सांगितली होती. “मी आणि डॉक्टर नेनेंच्या आईने मिळून त्यांना माझे काही चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते चित्रपट पाहताना डॉक्टर नेने म्हणायचे, आपण काही दुसरं काही करू शकत नाही का, चल बाहेर जाऊया आणि काही करूया”, असे माधुरीने सांगितलं होतं.

हेही वाचा – अभिषेकने ‘असं’ दिलं वडील अमिताभ यांना वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

माधुरी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा किस्सा सांगत पुढे म्हणाली, “मला वाटतं की त्यांनी फक्त अमिताभ यांनाच रिसेप्शनमध्ये ओळखलं होतं. जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी अमिताभ यांचा चित्रपट पाहिला होता आणि तो चित्रपट ‘अमर अकबर एंथॉनी’ होता. डॉक्टर नेने म्हणाले, मला असं वाटतंय की मी त्यांना ओळखतो. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही त्यांना चित्रपटामुळे ओळखत असाल.”

“…तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव आली”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मात्र, डॉक्टर नेनेंनी इतर कोणत्याही कलाकाराला ओळखले नव्हते. याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच हिंदी चित्रपट पाहिले नव्हते. लग्नाआधी माधूरी किती लोकप्रिय आहे याविषयी त्यांना माहित नव्हते. ते दोघे पहिल्यांदा माधुरीच्या भावाच्या घरी भेटले होते, नंतर त्यांनी १७ ऑक्टोबर १९९९ साली लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. अरिन आणि रयान अशी त्यांच्या मुलांची नावं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big b birthday madhuri dixit revealed husband sriram nene only recognized amitabh bachchan at their reception hrc