बॉलीवडूचा शेहनशहा अमिताभ बच्चनच्या ‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला ट्रेलर नुकताच टी.व्हीवर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ यांनी हा पहिला ट्रेलर ट्विट केला आहे. ‘सीखना बंद तो जितना बंद’ ही या गेमशोची टॅगलाइन आहे.
या प्रोमोद्वारे अमिताभ यांनी कोणत्याही वयात शिक्षण सुरु ठेवण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ‘सीखना बंद तो जितना बंद’ असे ब्रीदवाक्य बोलून लोकांना शिक्षण घेण्याचा संदेश बीग बी या शोद्वारे देणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नवीन सिझनच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.

Story img Loader