जया बच्चन यांच्याविषयी बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना किती जिव्हाळा आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. सध्या अमिताभ बच्चन हे ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात नवी दिल्लीत व्यस्त होते. मात्र, जया बच्चन यांच्या वाढदिवसासाठी या सगळ्या बिझी श्येडुलमधून वेळ काढत अमिताभ यांनी मुंबईला धाव घेतली. या मेजवानीला हजर राहण्याअगोदर प्रमोशनचे काम आटपून आज लवकरात लवकर मुंबईला जाणारे विमान गाठायचे आहे. विमानातून उतरल्यानंतर थेट जयाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासहित एका खास मेजवानीला हजर रहायचे असल्याच्या भावना ट्विटरवरून अमिताभ यांनी व्यक्त केल्या.
जया यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या खास मेजवानीला संपूर्ण बच्चन कुटुंबीय हजर होते. यावेळी अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदासुद्धा आपल्या कुटुंबासहित मेजवानीला हजर राहिली होती. यानिमित्ताने घरातील मुलांच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण हास्याने भरून गेले आहे. पालक म्हणून एखाद्यासाठी अशाप्रकारचे प्रेमळ क्षण महत्वपूर्ण असल्याच्या भावना अमिताभ यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.
T 1444 – Entire family here .. such a joy .. a quiet private dinner to bring in Jaya’s birthday with Abhi, Ash, Shweta and grandchildren !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 8, 2014
लवकरच ते ‘भूतनाथ रिटर्न्स’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी दुबईला रवाना होणार आहेत.
T 1444 – In a few hours back on plane to Dubai for the premier of ‘BR’ .. life is rapid and involved .. when not, would be worrisome !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 8, 2014