बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना जलसा या बंगल्यावर नेहमी भेट देतात. यावेळेस त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्यालाही चाहत्यांच्या भेटीसाठी नेले होते. यापूर्वी अभिषेकने खूपवेळा अमिताभसोबत चाहत्यांना भेट दिली होती. परंतु, आराध्या पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली असून तिने सर्वांना हर्षभरित केले. १८ महिन्यांची आराध्या ऐश्वर्यासोबत प्रवास करुन गेल्याच आठवडयात भारतात परतली होती. यावर्षी नोव्हेंबरमध्ये आराध्या दोन वर्षांची होणार आहे.

Story img Loader