बहुप्रतीक्षित ‘बिग बॉस हिंदी’चा १६वा सीझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी सलमान खानने ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वातील पहिल्या सदस्याबाबत खुलासा केला. ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोजिक  यंदाच्या पर्वात सहभागी झाला आहे. आता ‘बिग बॉस’कडून नवीन सदस्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात यंदाच्या पर्वात रॅपरची एन्ट्री होणार आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कलर्स’कडून एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला होता. नव्या प्रोमो व्हिडीओमध्ये रॅपर बिग बॉससह बोलताना दिसत होता. व्हिडीओमध्ये बिग बॉसला रॅपर ‘ब्रो ब्रो’ असं म्हणून बोलत होता. यावर बिग बॉस त्याला “ब्रो, मी बिग बॉस आहे हे तू विसरत आहेस”, असं उत्तर देतात. पुढे “यावेळी तुम्हीही खेळत आहात. त्यामुळे तुम्हीही ब्रो होणार”, असं रॅपर म्हणतो. तेव्हा “ओके ब्रो, पण तरीही बॉस मीच राहणार”, असं बिग बॉस म्हणतात.

हेही वाचा >> “मला रणबीर कपूरला कंडोम…”, दीपिका पदुकोणची ‘ती’ इच्छा ऐकून संतापले होते ऋषी कपूर

हेही वाचा >> “माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा

‘बिग बॉस’च्या या व्हिडीओमधील रॅपरला प्रेक्षकांनी ओळखलं होतं. कमेंट करत प्रेक्षकांनी हा रॅपर दुसरा तिसरा कोणी नसून ‘एमसी स्टॅन’ असल्याचं सांगितलं होतं. २३ वर्षीय एमसी स्टॅन त्याच्या ‘वाटा’ या रॅप सॉन्गमुळे प्रसिद्धीझोतात आला. त्याचे युट्यूबवर दोन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. परंतु, ‘कलर्स’ने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. त्यामुळे खरंच बिग बॉसच्या घरात रॅपर एमसी स्टॅनची एन्ट्री होणार का?, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

हेही वाचा >> केबीसीमध्ये सहभागी झालेल्या शिक्षिकेला अमिताभ बच्चन यांचा मदतीचा हात, म्हणाले “मुलांच्या शिक्षणासाठी…”

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त शो असला, तरीही तो तितक्याच आवडीने पाहिला जातो. गेली अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. यंदाच्या पर्वासाठीही प्रेक्षक आतुर आहेत.

Story img Loader