‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी अजूनही हा शो चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी आणि यंदाच्या पर्वात घरात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अपूर्वा नेमळेकर या पर्वाची रनर अप ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर नुकतीच तिने एक घोषणा केली आहे.
अपूर्वा अभिनयाच्याबरोबरीने तिच्या लूकसाठीदेखील चर्चेत असते. सोशल मीडियावर ती कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बिग बॉसनंतर आता अपूर्वा लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. ‘द डिलिव्हरी बॉय’ असं या शॉर्ट फिल्मच नाव असून स्वयंभू स्टुडिओजने या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. ती बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिने या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
Photos : “…म्हणून सॅम पाठी लागला” बॅकलेस फोटोतील ‘बोल्ड’ लूकवरून ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्री ट्रोल
बिग बॉस कार्यक्रमात अपूर्वाच्या खेळाडूवृत्तीने, तिच्या स्पष्टवाक्तेपणामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा हा बेधडक अंदाज पाहून ती ‘बिग बॉस ४’ जिंकेल असं सर्वांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. अक्षय केळकरने ‘बिग बॉस ४’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण अपूर्वाच्या वाट्याला एक मोठं यश आलं आहे.
अपूर्वाने अनेक मालिका व नाटकांत काम केलं आहे. ‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंतामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. आता ‘बिग बॉस मराठी’मुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.