अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनासह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. या सत्तानाट्यावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा : “खेळ तर आता सुरू…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत
राज्यातील राजकीय परिस्थितीवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याचा भाऊ आणि बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपले मत स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : “वडिलांच्या ओळखीची काय गरज?”, नवाजुद्दिन सिद्दिकीची पत्नी पूजा भट्टवर भडकली; म्हणाली, “मी कधीच गैरफायदा…”
उत्कर्षने इन्स्टाग्राम स्टोरीला मतदान केलेल्या बोटाचा फोटो शेअर करत त्यावर “मतदात्याच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना…” असे लिहिले आहे. उत्कर्षप्रमाणे यापूर्वी हेमंत ढोमे, अभिनेत्री तेजस्वी पंडित यांनी सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या तीन वर्षात त्यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीनंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांसह राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.