‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच या नव्या पर्वाचं सुत्रसंचालन करणार आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबत चर्चा सुरु असतानाच या पर्वाचे दोन प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले आहेत. एका प्रोमोमध्ये स्पर्धक जोडीची झलक पाहायला मिळत आहे. पण प्रोमोमधील या जोडीचा बोल्ड अवतार पाहून नेटकऱ्यांना मात्र राग अनावर झाला आहे.

कलर्स मराठी वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये एक स्पर्धक जोडी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. ‘मोहे रंग लगा दे रे’ गाण्यावर डान्स करणाऱ्या स्पर्धकांचा चेहरा मात्र लपवण्यात आला आहे. ही स्पर्धक जोडी कोण? ही चर्चा सोशल मीडियावर सर्वाधिक रंगताना दिसत आहे. पण त्याचबरोबरीने त्यांचा बोल्ड अवतार पाहून नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

मराठी गाणी संपली वाटतं, हे मराठी ‘बिग बॉस’चं आहे ना…, हा फालतूपणा आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, बॉयकॉट करायची वेळ आली अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या प्रोमोमध्ये बोल्ड डान्स करणारं जोडपं कोण आहे? हे अद्यापही कळालेलं नाही. पण प्रोमो पाहून अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

या प्रोमोमध्ये दिसणारी अभिनेत्री नेहा खान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. येत्या २ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’ मराठीचा ग्रँड प्रीमियर सोहळा संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच पुढील आठवड्यापासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता ‘बिग बॉस’ मराठीचं नवं पर्व प्रेक्षकांना पाहता येईल.

Story img Loader