बिग बॉस आज स्पर्धकांना ‘बोचरी टाचणी’ हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. या टास्कमध्ये आज कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर स्पर्धकांमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. त्यामुळे आज कोण कोणाला नॉमिनेट करणार आणि कोण सुरक्षित होणार हे पाहायला विसरु नका.
काल भूषण कडू घराबाहेर पडला. त्याच्या जाण्याचे दु:ख बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यांच झाले. आता येत्या आठवड्यामध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करणार आणि कोण सुरक्षित होणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. बिग बॉस यांनी मागील आठवड्यामध्ये सदस्यांवर ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे’ हे कॅप्टनसी कार्य सोपावले होते. ज्यानुसार कॅप्टन तोच होणार होता जो विजयाचा झेंडा रोवेल.
पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतीकात्मक वापर होत असे. कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका होती. मागील आठवड्यात कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे होते.
या तिघांमध्ये सरस ठरत पुष्करने विजयाचा ध्वज फडकावला आणि तो बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन झाला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु होणार असून घरातील स्पर्धक कोणती नवी युक्ती योजणार आणि कोणाला नॉमिनेट करणार हे पाहायला विसरू नका आज रात्री ९.३० वा. बिग बॉस मराठीमध्ये फक्त कलर्स मराठीवर.