शुक्रवारी मोठ्या जल्लोषात देशभरात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक बॉलिवू़ड कलाकरांच्या घरी देखील गणराय विराजमान झाले आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालंय. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात गणपती बाप्पाचीचं सर्व स्पर्धकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. विषेश म्हणजे शोमधील स्पर्ध राकेश बापटने स्वत:च्या हातांनी ही सुंदर मूर्ती घडवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राकेश बापटच्या घरी देखील दरवर्षी गणरायची स्थापना केली जाते. राकेश दरवर्षी घरच्या घरीचं बाप्पाची मातीची मूर्ती साकारतो. यंदा राकेश घरी नसला तरी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात त्याने बाप्पाची मनमोहक मूर्ती साकारली आहे. त्यानंतर सर्व स्पर्धकांनी मोठ्या जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलं. बाप्पाची स्थापना करून पूजा करण्यात आली. यावेळी स्पर्धकांनी पारंपरिक वेषभूषा केल्याचं पाहायला मिळालं.

हे देखील वाचा: मुनमुन दत्ताने शेअर केले गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो; नेटकऱ्यांनी विचारलं ‘टप्पू कुठे आहे?’

अभिनयासोबत राकेश एक उत्तम कलाकारदेखील आहे. राकेश एक उत्तम चित्रकार आहे. त्याला व्यंगचित्र काढण्याची देखील आवड आहे. त्याचसोबत दरवर्षी तो गणेशोत्सवासाठी घरच्या घरी बाप्पाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्ती साकारतो.

हे देखील वाचा: “मग न्याय आणि माणुसकी विसरून जा”; तालिबान्यांना समर्थन देणाऱ्या देशांना जावेद अख्तर यांनी फटकारलं

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातही राकेशने बाप्पाची मनमोहक मूर्ती घडवली आहे. राकेशची ही कला पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये सहभागी झाल्यापासूनच राकेश बापट चांगलाच चर्चेत आला आहे.