रिअॅलिटी गेम शो ‘बिग बॉस’ने जीवनात आपल्याला खूप काही शिकविल्याचे मॉडेल-अभिनेत्री अदिती गोवित्रीकरचे म्हणणे आहे. अदिती गोवित्रीकर ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या सत्रातील एक स्पर्धक होती. विंदू दारा सिंग विजेता ठरलेला ‘बिग बॉस’चे ते सत्र सर्वांत चांगले सत्र असल्याचे तिने म्हटले आहे. अदिती म्हणाली, ‘बिग बॉस’मुळे माझ्या कारकीर्दीत काही विशेष बदल झाला नसला, तरी जीवनावश्यक शिकवण निश्चितच मिळाली. माझ्या मानसिकतेत बदल होण्यात ‘बिग बॉस’चा वाटा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात व्यतित केलेल्या ७७ दिवसांनी मला खूप कणखर बनविले. त्याकाळात मी खूप काही शिकले. ‘बिग बॉस’चे तिसरे सत्र हे सर्वांत चांगले सत्र होते. ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा जाण्यास कोणतीही रुची नसल्याची कबुली देत अदिती म्हणाली, या रिअॅलिटी गेम शोमध्ये भाग घेऊन खूप मजा आली असली, तरी पुन्हा यात सहभागी होण्याची इच्छा नाही. परंतु, ‘फिअर फॅक्टर’ जास्त कठीण असल्याने त्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. अदितीने विविध कार्यक्षेत्रात आपला हात आजमावला असून, एक डॉक्टर ते मॉडेल, अभिनेत्री आणि निर्माती असा तिचा प्रवास राहिला आहे. ज्याचा तिने पुरेपुर आनंद उपभोगला आहे. सध्या ती अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याबरोबर एक आहारतज्ज्ञ म्हणूनसुध्दा काम पाहाते. अदिती वैद्यकीयक्षेत्रातील पदवीधर असून, २००१ मधील मिसेस वर्ल्ड किताब पटकलिल्यावर तिने चित्रपटात आपले नशिब आजमाविण्याचा प्रयत्न केला.

Story img Loader