जेनिफर विंगेट मनोरंजन सृष्टीतली एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाची छाप तिने सगळ्यांवर पाडली आहेच, पण तिच्या सौंदर्यानेही ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेनिफरच्या चाहत्यांमध्ये फक्त इंडस्ट्रीबाहेरील तिचे चाहतेच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्यांचाही समावेश आहे. आता या तिच्या सेलिब्रिटी फॅन्सच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे आणि ते नाव आहे विशाल आदित्य सिंग. विशालने जेनिफरला डेट करण्याची इच्छा व्याक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “मला माफ करा…” अखेर आलिया भट्टने मागितली जाहीर माफी

काही महिन्यांपूर्वी विषय खूप चर्चेत होता. कारण विशालने ‘बिग बॉस १३’ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मधुरिमा तुलीसोबतच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. त्यानंतर आता त्याने जेनिफरबद्दल वाटणाऱ्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत विशाल आदित्य सिंगने खुलासा केला की जेनिफर विंगेटसाठी तो वेडा आहे आणि त्याला ती खूप आवडते. तसेच विशालने हे देखील कबूल केले की तो जेनिफरला सोशल मीडियावर स्टॉक करतो आणि तिची प्रत्येक पोस्ट तो आवार्जून पाहतो. यातील महत्वाचा भाग असा की तो जेनिफरला कधीच भेटला नाही. त्याने तिची कामं पाहिलेली आहेत आणि ती त्याला फार आवडली. त्यामुळे जेनिफर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे त्याला माहीत आहे. याशिवाय, भविष्यात कधी संधी मिळाली तर जेनिफरला डेट करायला त्याला आवडेल, असेही त्याने स्पष्ट केले.

आज जरी विशाल आदित्य सिंगला जेनिफर आवडत असली, तरी याआधी तो मधुरिमा तुलसीच्या प्रेमात पडला होता. काही महिने एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. ‘बिग बॉस १३’ मध्ये हे दोघेही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्या या वागण्याने वेधून घेतले होते.

हेही वाचा : आशिकी ३ मध्ये कार्तिक आर्यनबरोबर दिसणार जेनिफर विंगेट? निर्माते म्हणाले…

तर दुसरीकडे, जेनिफरचा घटस्फोट झाला आहे. तिचे पहिले लग्न करण सिंग ग्रोव्हरशी झाले होते. परंतु काही काळानंतर त्याने जेनिफरशी घटस्फोट घेतला आणि बिपाशा बासूशी लग्न केले. तर आता लवकरच करण सिंग ग्रोव्हरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमनही होणार आहे. पण घटस्फोटानंतर जेनिफर अद्याप अविवाहित आहे. त्यामुळे भविष्यात विशाल आदित्य सिंग आणि जेनिफर विंगेट यांची जोडी पाहायला मिळतेय का याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg biss fame actor vishal aditya singh expressed his feelings about jennifer winget rnv