बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक स्पर्धक आहेत. त्यांच्या विचित्र वक्तव्यामुळे ही स्पर्धक मंडळी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना समजवताना बिग बॉसचा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खानही अशा काही गोष्टी बोलून जातो ज्याचा उल्लेख करणे गरजेचे होते. शो दरम्यानच्या विविध प्रकरणावर आपले मत मांडणा-या सलमानने नुकतेच मुलींच्या तोकड्या कपड्यांवर त्याचे मत मांडले. बिग बॉसच्या या पर्वात मुलींचे कपडे हा चर्चेचा मुद्दा झाला आहे. यातील स्पर्धक स्वामी ओम यांनी लोपामुद्रा आणि मोनालीसा यांनी तोकडे कपडे घालण्यावरून टिप्पणी केली होती. स्वामी ओम म्हणालेले की, मुलींना अशा प्रकारचे कपडे शोभा देत नाहीत. स्वामींच्या या कमेन्टनंतर बिग बॉसच्या घरात बरेच वाद झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

[jwplayer PuSvtqP8]

वीकेन्ड का वार एपिसोडमध्ये तोकडे कपडे घालण्या-या मुलींवरून सलमानने स्वामीजींचा चांगलाच क्लास घेतला. मुलींनी तोकडे कपडे घालण्यावरून जर त्यांचे आई-वडिल, भाऊ-बहिण, नवरा यांची काहीच हरकत नाही तर तुम्हाला यावर बोलण्याची काय गरज आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळेच मुलींना असुरक्षित वाटते. मुलींनी तोकडे कपडे घालण्यात काहीच गैर नाही, असे सलमान म्हणाला. सलमानच्या या वक्तव्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याची प्रशंसा केली. यानंतर स्वामी ओम यांनी माफी मागत म्हटले की, मी अशा वातावरणातून आलोय जिथे हे सर्व चुकीचे मानले जाते.

[jwplayer iBVKlRbe]

नुकतीच या बिग बॉसच्या घरात या स्पर्धेतील माजी स्पर्धक सनी लिओनी येऊन गेली. त्यादरम्यान तिने घरातील सदस्यांना एक टास्क दिले. या टास्कअंतर्गत सर्व स्पर्धकांना एक असा व्हिडिओ तयार करायचा होता जो लगेच व्हायरल होईल. त्यावर लोपा, मोना, रोहन आणि मनूच्या टीमने पोल डान्स करण्याचा निर्णय घेतला.  मग मोनाने लोपाला पोल डान्स करण्यास सांगितले. लोपाचे शरीर लवचिक असल्यामुळे ती चांगला पोल डान्स करू शकते असे मोनाचे म्हणणे होते.  यावेळी मनू आणि रोहन समोर बसून तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते. टास्कमध्ये सांगण्यात आल्यानुसार लोपाच्या पोल डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, लोपाने सनीच्या टक्कर पोल डान्स केला. तिच्या या पोल डान्सची तुलना सनीच्या पोल डान्सशी केली जातेय.