टेलिव्हिजन वर्तुळात प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी आणि ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या करिअरकडेच जास्त लक्ष देत आहे. हिना तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधते. रॉकी जयस्वाल याच्यासोबत गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती रिलेशनशिपमध्ये आहे. बिग बॉसमधील एका भागातही या दोघांच्या प्रेमाची सुरेख बाजू पाहायला मिळाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपलं नातं या दोघांनी कधीच लपवलं नाही. शिवाय प्रत्येक वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना ‘कपल गोल्स’ दिले ते वेगळेच. आता मात्र या दोघांनीही त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं आहे. प्रेमाच्या या प्रवासात एकमेकांना खास सरप्राईज देणाऱ्या रॉकी आणि हिनाचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा आहेत. सातासमुद्रापार, परदेशात हे खास क्षण रंगल्याचं वृत्त सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

फॅशन वीकच्या निमित्ताने दुबईमध्ये गेलेल्या हिनाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून तिचा प्रियकर रॉकीसुद्धा तिथं पोहोचला आणि वाळवंटाच्या मधोमध सुरेख अंगठी देत त्यानं हिनासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉकी बऱ्याच दिवसांपासून असं काहीतरी हटके करण्याच्या विचारात होता.

‘इंडिया डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हॉट एअर बलूनमधून वाळवंटाची सफर करायला गेलं असतानाच रॉकीने गुडघ्यांवर बसून हिनाला अंगठी घातली. साहसी खेळांप्रती हिनाचं प्रेम पाहता रॉकीने हा बेत आखल्याचंही म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे हिनासाठी या सर्व गोष्टी अनपेक्षित होत्या. पण, आपल्यासाठी कोणा एका व्यक्तीने इतका सुरेख बेत आखणं ही बाब तिचं मन जिंकून गेली असणार असच म्हणावं लागेल.

ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?